खा. नारायण राणे यांच्या स्वागतासाठी बांद्यात जय्यत तयारी; भव्य रॅलीचे आयोजन
बांदा:
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार नारायण राणे आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या या आगमनानिमित्त कार्यकर्ते याच्या वतीने बांदा येथे भव्य आणि जंगी स्वागत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या सोहळ्यासाठी बांद्यात सध्या जय्यत तयारी सुरू असून कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.
भव्य रॅलीचे आयोजन
खासदार राणे यांच्या स्वागतानंतर बांदा ते कणकवली अशी भव्य मोटारसायकल आणि वाहन रॅली काढण्यात येणार आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही रॅली राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या रॅलीच्या माध्यमातून राणे समर्थक सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठे शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहेत
नियोजनाचा आढावा
कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी आज सकाळी बांदा येथे पाहणी केली. तसेच, आमदार निलेश राणे यांनीही बांद्यात उपस्थित राहून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यांनी स्वागत व्यवस्था, रॅलीचा मार्ग आणि एकूण नियोजनाचा सविस्तर आढावा घेतला.
यावेळी माजी उपसरपंच जावेद खतीब, बाळू सावंत, साई सावंत, मधू देसाई, गुरु सावंत, सुनील धामापूरकर, ज्ञानेश्वर सावंत, स्वप्नील सावंत, हुसेन मकानदार, पांडुरंग नाटेकर, प्रवीण नाटेकर यांच्यासह भाजप महायुतीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.







