ठळक घडामोडी

शिरोडा वेळागर येथील ताज प्रकल्प ठरलेल्या जागेत होणार!कोणावरही अन्याय करणार नाही ! पालकमंत्री नितेश राणे

वेंगुर्ले : प्रतिनिधी
वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा वेळागर येथील पंचतारांकित ताज प्रकल्प बी वन मध्ये पब्लिक नोटीस मध्ये ज्या सर्व्हे नंबर मद्ये करायचे ठरवले आहे. त्याच भागात हा प्रकल्प करण्यात येणार आहे. अन्य भागात प्रकल्पाचे काम केले जाणार नाही. अशी ठाम भूमिका पालकमंत्री नितेश राणे यांनी आज वेंगुर्ले येथे झालेल्या बैठकीत मांडली. त्यामुळे सर्व्हे नंबर ३९ संघर्ष समितीच्या सदस्यांनी आभार मानले असून त्यांनी आपला ताज प्रकल्पाला विरोध नाही असे स्पष्ट केले.
याबाबत एमटीडीसी ने शासन स्तरावर सांगितलेली माहिती लेखी स्वरूपात आज या संघर्ष समितीला देण्यात आली. यावेळी संघर्ष समिती चे नेते जयप्रकाश चमणकर, तसेच आजू आमरे, राजू आंदुर्लेकर व अन्य सदस्य उपस्थित होते. या बैठकीला एमटीडीसीचे दीपक माने, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजप जिल्हाद्यक्ष प्रभाकर सावंत, वेंगुर्ले तालुकाध्यक्ष पपू परब, शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, सभापती शंकर घारे, उपसभापती सचिन देसाई आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. वेंगुरी फळ संशोधन कार्यालयात ही बैठक पार पडली.