कुडाळ
गोवा येथे आरडी स्कूलमध्ये इंटरस्कूल स्विमींग चॅम्पियनशीप पार पडली.त्यामध्ये मुष्टीफंड हायस्कूल गोवा येथे शिकत असलेल्या सिंधुदुर्गच्या कु. शमिका सचिन चिपकर हिने 50 मी. ब्रेस्टस्ट्रोक मध्ये गोल्ड, 50मी. फ्रीस्टाईल मध्ये ब्राॅन्झ, 200मी. आय एम मध्ये ब्राॅन्झ तसेच 4 × 50मी. फ्रीस्टाईल रिले मध्ये सिल्व्हर मेडल पटकावले.तिच्या या यशाबद्दल मुष्टीफंड हायस्कूलच्या शिक्षक वृंदानी विशेष कौतुक करत शुभेच्छादिल्या चिपकर हिने आतापर्यंत अनेक स्पर्धा मध्ये यश मिळवले आहे . ती आपल्या आई वडील तसेच सिंधुदुर्ग जिल्याचे नावं लौकिक करत आहे.







