ठळक घडामोडी

दीपावलीनिमित्त शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्याकडून दीपकभाई केसरकर यांना शुभेच्छा!

सावंतवाडी : दीपावली सणाच्या निमित्ताने शिवसेना जिल्हाप्रमुख, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक श्री. संजू परब यांनी माजी मंत्री तथा सावंतवाडीचे आमदार श्री. दीपकभाई केसरकर यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.

यावेळी संजू परब यांनी आमदार दीपकभाई केसरकर यांना दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा देत त्यांच्याशी स्नेहपूर्ण संवाद साधला. आबा केसरकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.