ठळक घडामोडी

यशाची सुवर्ण पहाट…. संस्कार नॅशनल स्कूल च्या विद्यार्थ्यांची नेत्रदीपक कामगिरी. !शाळेचा दहावीचा निकाल लागला १०० टक्के


​निरवडे (प्रतिनिधी):
नुकत्याच जाहीर झालेल्या माध्यमिक शालान्त परीक्षा सन 2025-26 (इयत्ता १० वी) निकालात निरवडे येथील ‘संस्कार नॅशनल स्कूल’ ने आपले वर्चस्व कायम राखले आहे. शाळेचा निकाल १०० टक्के लागला असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक गुणवत्तेत पुन्हा एकदा बाजी मारली आहे.
​शाळेने सलग आपल्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.प्रशाळेतील सात विद्यार्थ्यांनी विशेष प्रविण्यासह प्रथम श्रेणी तर उर्वरित विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन यश संपादन केले असून प्रशालेमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय येण्याचा बहुमान अनुक्रमे कुमार निशाद नित्यानंद प्रभू (89.40%),
कुमारी सिद्धी लक्ष्मण राऊत (88.40%) कुमार ओम बाबू नाईक (87.00%)या विद्यार्थ्यांनी पटकवला आहे.
​या यशाबद्दल बोलताना शाळेच्या मुख्याध्यापिका आणि संस्थाचालकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम प्रणाली रेडकर मॅडम यांनी असे प्रतिपादन केले की, “विद्यार्थ्यांनी वर्षभर केलेले सातत्यपूर्ण प्रयत्न, शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन तसेच परिश्रम आणि पालकांनी दाखवलेला विश्वास यामुळेच हे यश शक्य झाले आहे. शाळेत घेण्यात आलेल्या सराव परीक्षा आणि वैयक्तिक मार्गदर्शनाचा (Personal Mentoring) फायदा विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेत झाला.”
​निकाल जाहीर होताच शाळेच्या परिसरात आणि निरावडे गावात आनंदाचे वातावरण पसरले. यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
“संस्कार, शिस्त आणि गुणवत्ता या ब्रीदवाक्याला साजेशी कामगिरी करत विद्यार्थ्यांनी केवळ गुणामध्येच नाही तर आत्मविश्वासातही मोठी भरारी घेतली आहे.
​हे यश केवळ विद्यार्थ्यांचे नसून, संपूर्ण निरावडे पंचक्रोशीचा अभिमान आहे. ग्रामीण भागातील मुले योग्य संधी मिळाल्यास काय करू शकतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.”
— श्री. शेखर जैन सर,संस्थाचालक, संस्कार नॅशनल स्कूल यांनी गुणवंत: सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन! केले आहे भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.