ठळक घडामोडी

तळवडे अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटीचा २५ वा वर्धापन दिन थाटात साजरा!- अनेक मान्यवर यांनी दिल्या शुभेच्या

तळवडे अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटीचा २५ वा वर्धापन दिन थाटामाटात अनेक मान्यवर यांनी दिल्या शुभेच्या

सावंतवाडी 
तळवडे येथील तळवडे अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेडने नुकताच आपला २५वा वर्धापन दिन अत्यंत उत्साहात आणि दिमाखदारपणे साजरा केला. हा रौप्यमहोत्सवी सोहळा संस्थेच्या आतापर्यंतच्या यशस्वी वाटचालीचा आणि सभासद व हितचिंतकांच्या विश्वासाचा एक भव्य उत्सव ठरला.यावेळी केक कापून हा वर्धापन दिन साजरा करण्यात आला . 


कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या उपस्थितीत तळवडे अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड संस्थेचे संस्थापकः दिवंगत प्रकाश परब याच्या प्रतिमेसपुष्पहार घालून करण्यात आली यावेळी उपस्थित मान्यवर याच्या उपस्थितीत केक कापून रौप्यमहोत्सवी सोहळा संस्थेचा साजरा करण्यात आला . या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष विलास परब , उपाध्यक्ष,नारायण परब , माजी अध्यक्ष दिलीप मालवणकर , स्व प्रकाश परब यांचे चिरंजीव सूरज परब, शिवसेना पदाधिकारी बाबू कुडतरकर , संचालक मंडळ विलास नाईक ,रवींद्र काजरेकर , रघुनाथ गावडे , वसंत पडते , सुभाष रेडकर , सगुण जाधव , सौ शामल रेडकर , अर्बन को ऑप सोसा व्यवस्थापक विनोद वराडकर, कॅशियर योगेश सावंत, लिपिक दिनेश परब ,तसेच यावेळी तळवडे विकास सेवा सोसायटी अध्यक्ष आपा परब , अनिल जाधव,चंदू परब , कृष्णा लोके , प्रदीप लोके बाळू कांडरकर, पंढरी मांजरेकर , महेश परब , रवींद्र सावंत रोहित परब ,अल्पबचत प्रतिनिधी गौरवी तळवडेकर, किरण परब, गौरी वैद्य ,दिपाली पेडणेकर,तसेच सभासद, तसेच परिसरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. संस्थेच्या प्रगतीत सिंहाचा वाटा उचलणाऱ्या संस्थापक सदस्यांचा आणि ज्येष्ठ सभासदांचा यावेळी आभार मानले. तळवडे अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड संस्थेचे संस्थापकः दिवंगत प्रकाश परब यांच्या दूरदृष्टीमुळे आणि अथक परिश्रमामुळेचया संस्थेने आज हे यश संपादन केले आहे, या भावना अनेकांनी व्यक्त केल्या.
यावेळी बोलताना संस्थेचे उपाध्यक्ष प्रा नारायण परब ,विलास नाईक ,तसेच रवींद्र काजरेकर यांनी गेल्या २५ वर्षांतील संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, संस्थेचे संस्थापकः दिवंगत प्रकाश परब यांच्या दूरदृष्टीमुळे “छोट्याशा रोपट्यापासून सुरू झालेली आपली संस्था आज एका विशाल वटवृक्षात रूपांतरित झाली आहे. हे सर्व आपल्या संस्थेचे सर्व संचालक मंडळ ,कर्मचारी ,सहकारी यांच्या प्रामाणिक कार्यामुळे आणि सभासदांच्या अढळ विश्वासामुळे शक्य झाले आहे.ग्रामीण भागातील आर्थिक गरजा पूर्ण करण्यासोबतच, आम्ही सामाजिक बांधिलकी जपण्याचेही काम केले आहे.”तळवडे अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेडने समाजाच्या आर्थिक विकासात दिलेल्या योगदानाची यावेळी प्रशंसा करण्यात आली. हा २५वा वर्धापन दिन केवळ एक सोहळा नसून, संस्थेच्या पुढील वाटचालीस प्रेरणा देणारा एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. असे मत उपस्थित मान्यवर यांनी मांडले . या कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शनाने झाला. संस्थेच्या यशामध्ये हातभार लावणाऱ्या सर्वांचे यावेळी आभार मानण्यात आले.