ठळक घडामोडी

सिंधुदूर्ग जिल्हा पञकार संघाचे ‘उत्कृष्ट पञकार’ पुरस्कार जाहीर!६ जानेवारी रोजी ‘पत्रकार दिनी’ पुरस्कार वितरण

जिल्हा पञकार संघाचे ‘उत्कृष्ट पञकार’ पुरस्कार जाहीर

  • ६ जानेवारी रोजी ‘पत्रकार दिनी’ पुरस्कार वितरण

सिंधुदुर्गनगरी

सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार जाहीर करण्यात आले. आज झालेल्या जिल्हा पत्रकार संघाच्या बैठकित देवगड तालुक्यातील अयोध्याप्रसाद गावकर, सावंतवाडी तालुक्यातील सागर चव्हाण , कणकवली तालुक्यातील सुधीर राणे, मालवण येथील अर्जुन बापर्डेकर, कुडाळ तालुक्यातील प्रशांत पोईपकर, वेंगुर्ला येथील प्रदीप सावंत, सिंधुदुर्गनगरीतील लवू महाडेश्वर, दोडामार्ग येथील ओम देसाई, वैभववाडीतून महेश रावराणे या ९ जणांची यावर्षीचे उत्कृष्ट पत्रकार म्हणून जिल्हा पत्रकार संघाच्या जिल्हा कार्यकरिणीच्या बैठकीत निवड करण्यात आली.

पत्रकार भवन येथे उमेश तोरसकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारिणीची बैठक झाली. यावेळी परिषद प्रतिनिधी गणेश जेठे , उपाध्यक्ष संतोष राऊळ, आनंद लोके, बंटी केनवडेकर, किशोर जैतापकर सचिव बाळ खडपकर, खजिनदार संतोष सावंत,लक्ष्मीकांत भावे, राजन नाईक, संजय वालावलकर, अमित खोत, प्रशांत वाडेकर, सुहास देसाई महेंद्र मातोंडकर आदी उपस्थित होते.

उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार प्राप्त पत्रकारांचा ६ जानेवारी रोजी ‘पत्रकार दिनी’ मान्यवरांच्या हस्ते गौरव या पुरस्काराचे वितरण होणार आहे. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ पत्रकार प्रसन्ना जोशी यांना प्रमुख वक्ते म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, माजी मंत्री आम. दीपक केसरकर, आम. निलेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधिक्षक डॉ. मोहन दहीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी आदींना प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.