ठळक घडामोडी

सावंतवाडी विधानसभा संघटकपदी चंद्रकांत उर्फ बाळा गावडे; मातोश्रीवरून सिंधुदुर्गातील शिवसेनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची घोषणा

सिंधुदुर्ग

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संघटनात्मक बांधणीला नवी बळकटी देण्यात आली असून, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार विविध पदांवर नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या संघटकपदी गेल्या विधानसभा निवडणुकीतील प्रबळ दावेदार चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबईतील ‘मातोश्री’ येथून या नियुक्त्यांची घोषणा करण्यात आली. या नव्या नियुक्त्यांमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या संघटनात्मक रचनेला नवी ऊर्जा मिळणार असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष अधिक सक्रिय करण्याच्या दृष्टीने हे महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.

जिल्ह्यात पक्षसंघटन अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने विविध महत्त्वाच्या पदांवर अनुभवी, निष्ठावंत आणि सक्रिय कार्यकर्त्यांची निवड करण्यात आली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती कळविण्यात आली आहे.

पदाधिकारी पुढीलप्रमाणे :

  • प्रवक्ते: जयेंद्र परुळेकर (सिंधुदुर्ग जिल्हा)
  • विधानसभा संघटक: चंद्रकांत उर्फ बाळा गावडे (सावंतवाडी विधानसभा)
  • उपजिल्हाप्रमुख:
  • संजय गावडे (वेंगुर्ले)
  • लक्ष्मण रावराणे (वैभववाडी)
  • रामराव उर्फ चंदन गावकर (दोडामार्ग)
  • उपजिल्हा संघटक:
  • वसंत खानविलकर (वैभववाडी)
  • लक्ष्मण आयनोडकर (वैभववाडी)
  • विनोद सांडव (मालवण)
  • तालुकाप्रमुख: राजू राठोड (कणकवली)
  • तालुका संघटक:
  • रमाकांत मोरे (वैभववाडी)
  • निशांत तोरसकर (सावंतवाडी)
  • विजय नाईक (वेंगुर्ले)
  • उपतालुका संघटक: राजेश टंगसाळी (कुडाळ)
  • तालुका संघटक (ओबीसी सेल): नारायण उर्फ आप्पा मांजरेकर कुडाळ

डीजी कक्ष (सोशल मीडिया) पदे :

  • जिल्हा समन्वयक: अमर घाडी (सिंधुदुर्ग जिल्हा)
  • विधानसभा समन्वयक:
  • प्रसाद रेवडेकर (कुडाळ विधानसभा)
  • विठोबा गुरव (कणकवली विधानसभा)
  • तालुका समन्वयक: विनय कदम (कुडाळ तालुका)
  • तालुका सह समन्वयक: प्रसाद गावडे (कुडाळ तालुका)
  • तालुका समन्वयक (इतर):
  • तपस्वी मयेकर (मालवण तालुका)
  • श्रीधर सावंत (कणकवली तालुका)
  • लोकेश माणगावकर (देवगड तालुका)
  • गुलझार काझी (वैभववाडी तालुका)
  • ओंकार पंडित (वेंगुर्ले तालुका)
  • सिद्धेश कासार (दोडामार्ग तालुका)

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या संघटकपदी चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांची झालेली नियुक्ती विशेष चर्चेचा विषय ठरली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी प्रभावी दावेदारी केली होती. त्यांच्या नियुक्तीमुळे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात पक्षाच्या संघटनात्मक कार्याला अधिक गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांवर पक्षातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष अधिक मजबूत, सक्रिय आणि प्रभावी करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.

नव्या नियुक्त्यांमुळे सिंधुदुर्गातील ठाकरे गटाच्या संघटनात्मक बांधणीला नवे बळ मिळणार असून, जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना आता वेग येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.