उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी विधानसभा मतदार संघात विविध उपक्रम
सावंतवाडी
ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज सावंतवाडी बस स्थानकातील खड्डे दगडाने बुजविण्यात येणार आहेत. तसेच वाढदिवसाचे औचित्य साधून सावंतवाडी मतदारसंघात विविध कार्यक्रम व उपक्रम राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती शिवसेनेचे सावंतवाडी तालुका संघटक मायकल डिसोजा यांनी दिली.
यात या आज सकाळी तालुक्यातील शेतकऱ्यांना काजू व सुपारी रोपाचे वाटप करण्यात येणार आहेत तसेच नवनियुक्त जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, विधानसभा संपर्कप्रमुख रुपेश राऊळ पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच शेतकऱ्यांना धान्य वाटप तसेच सावंतवाडी येथील शासकीय रुग्णालयात औषध पुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.







