ठळक घडामोडी

तळवडे सोसायटी आदर्श सहकाराचे प्रतीक’ – श्री. दीपकभाई केसरकर आमदार तथा माजी मंत्री

तळवडे येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीचा सुवर्ण महोत्सव सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न अनेक मान्यवर यांनी दिल्या भेटी

सावंतवाडी

तळवडे सोसायटी आदर्श सहकाराचे प्रतीक’ आहे असे मत श्री. दीपकभाई केसरकर आमदार तथा माजी मंत्री यांनी तळवडे विकास सेवा सोसायटी सुवर्ण महोत्सव सोहळ्यावेळी या कार्यक्रमला शुभेच्या देताना मत व्यक्त केले.
तळवडे येथील ‘तळवडे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि.’ या संस्थेने सहकार क्षेत्रात यशस्वीरीत्या ५० वर्षे पूर्ण केल्याबद्दल आयोजित करण्यात आलेला ‘सुवर्ण महोत्सव सोहळा’ काल, शुक्रवार दि. १ मे २०२६ रोजी अत्यंत उत्साही आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या विविध धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना ग्रामस्थांसह जिल्ह्यातील मान्यवरांनी मोठी उपस्थिती दर्शवली होती.
संस्थेच्या या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार व माजी शिक्षणमंत्री श्री. दीपकभाई केसरकर यांनी दुपारी भेट देऊन शुभेच्या दिल्या.

महोत्सवाचे औचित्य साधून सकाळी संस्थेच्या मुख्य कार्यालयात सत्यनारायण महापूजा व धार्मिक विधी संपन्न झाले. दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, ज्याचा लाभ हजारो ग्रामस्थांनी घेतला. संध्याकाळी स्थानिक कलाकारांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली.

यावेळी बोलताना आमदार दीपकभाई केसरकर यांनी संस्थेच्या ५० वर्षांच्या यशस्वी वाटचालीचे कौतुक केले. ते म्हणाले:

“सहकार क्षेत्रात ५० वर्षे अविरतपणे आणि विश्वासू सेवा देणे ही साधी गोष्ट नाही. तळवडे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीने शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्यांना आर्थिक आधार देऊन ग्रामीण भागाच्या विकासात मोठे योगदान दिले आहे. या संस्थेचा आदर्श जिल्ह्यातील इतर संस्थांनी घ्यावा.”

यावेळी आमदार दिपक केसरकर याच्या सत्कार सोसायटी अध्यक्ष बाबूराव उर्फ आपा परब यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सावंतवाडी सावंतवाडी पंचायत समिती सभापती सुस्मिता जाधव, सोसायटी गटसचिव संतोष राऊळ तसेच श्री रेडकर,विनोद वराडकर, नारायण परब,रविद्र परब, तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी सोसायटीच्या संचालक मंडळाने, कर्मचाऱ्यांनी आणि तळवडे ग्रामस्थांनी अथक परिश्रम घेतले.