तळवडे येथे ५ एप्रिलपासून भव्य ‘दशावतार नाट्य महोत्सवा’चे आयोजन
तळवडे:
स्व. प्रकाश परब फाऊंडेशनच्या वतीने आणि देवस्थान व्यवस्थापन समिती तसेच समस्त ग्रामस्थ तळवडे यांच्या सहकार्याने, तळवडे येथे ‘भव्य नाट्य महोत्सवाचे’ आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव ५ एप्रिल ते १३ एप्रिल २०२६ या कालावधीत पार पडणार असून, कोकणच्या लोककलेचा वारसा जपणाऱ्या दिग्गज दशावतार नाट्य मंडळांचे प्रयोग यात सादर होतील. हा महोत्सव श्री देवी सातेरी मंदिर, तळवडेचे भव्य पटांगणया ठिकाणी होणार आहे. ५ एप्रिल ते १३ एप्रिल २०२६ या कालावधीत सायंकाळी ६:३० वाजता. सुरू होणार आहे.
नऊ दिवसांचे कलाविष्कार:
या महोत्सवात दररोज विविध नामांकित दशावतार मंडळांचे पौराणिक प्रयोग सादर केले जाणार आहेत:
- ५ एप्रिल: बाळकृष्ण गोरे पारंपरिक दशावतारी लोककला नाट्य मंडळ, कवठी – ‘गोमय वज्रांगधारी’
- ६ एप्रिल: नाईक मोचेमाडकर पारंपरिक दशावतारी लोकनाट्य मंडळ, मोचेमाड – ‘नागनिलमणी’
- ७ एप्रिल: पार्सेकर पारंपरिक दशावतारी नाट्य मंडळ, वेंगुर्ला – ‘गोमय वज्रांगधारी’
- ८ एप्रिल: आजगांवकर पारंपरिक दशावतारी नाट्य मंडळ, आजगांव – ‘नारायणी महाकालेश्वर’
- ९ एप्रिल: वालावलकर पारंपरिक दशावतारी नाट्य मंडळ, वालावल – ‘देवी हनुमंतेश्वरी’
- १० एप्रिल: मामा मोचेमाडकर पारंपरिक दशावतारी नाट्य मंडळ, मोचेमाड – ‘रेवणनाथ’
- ११ एप्रिल: चेंदवणकर गोरे पारंपरिक दशावतारी नाट्य मंडळ, कवठी – ‘क्षणमुखासुर रूपिणी संहार’
- १२ एप्रिल: खानोलकर पारंपरिक दशावतारी नाट्य मंडळ, खानोली – ‘असुर मर्दिनी पुण्याक्षी’
- १३ एप्रिल: आरोलकर पारंपरिक दशावतारी नाट्य मंडळ, आरवली – ‘पुष्कर्णी तीर्थ’
हा महोत्सव स्व. प्रकाशदादा परब यांच्या प्रेरणेतून आयोजित करण्यात आला असून, फाऊंडेशनचे अध्यक्ष सूरज परब आणि तळवडे देवस्थान समिती तळवडे ग्रामस्थ सर्व सभासदांनी या सोहळ्यासाठी जय्यत तयारी केली आहे.
दशावतार कलेची ही मेजवानी अनुभवण्यासाठी परिसरातील सर्व रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.








