

निरवडे
: संस्कार नॅशनल स्कूल, निरवडे येथील विद्यार्थ्यांनी रक्षाबंधनाचा पवित्र सण उत्साहपूर्ण वातावरणात प्राथमिक आरोग्य केंद्र, निरवडे येथे साजरा केला.
यावेळी विद्यार्थ्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांना राखी बांधून त्यांच्याप्रती प्रेम, आदर व कृतज्ञता व्यक्त केली. सामाजिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी सदैव तत्पर असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कार्याबद्दल विद्यार्थ्यांनी त्यांचे आभार मानले.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांना रक्षाबंधनाच्या सणामागील प्रेम, आपुलकी, संरक्षण आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश मिळाला. प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमासाठी संस्कार नॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका, शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. हा उपक्रम सर्वांसाठी आनंददायी व संस्मरणीय ठरला.







