सिंधुदुर्ग बँकेच्या तळवडे शाखेचा स्थलांतर सोहळा!
सिंधुदुर्ग:
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., सिंधुदुर्ग यांची तळवडे शाखा आता नव्या वास्तूमध्ये स्थलांतरित होत आहे. या निमित्ताने एका भव्य “तळवडे” शाखा कार्यालय स्थलांतर सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. तळवडे येथील शिवराम परब यांच्या इमारत मध्ये तळवडे या ठिकाणी या नूतन स्थलांतर सोहळा थाटात संपन्न होणार आहे.
सोहळ्याची तारीख व वेळ:
मंगळवार, दिनांक १६ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ठीक १०.३० वाजता.स्थळ: श्री. शिवराम विठ्ठल परब यांची इमारत क्र. २५१, तळवडे वेंगुर्ला रोड, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.
प्रमुख उपस्थिती व मान्यवर
या सोहळ्याचे उद्घाटन सौ. डॉ. राजलक्ष्मी रविराज गायकवाड (संचालिका, धनश्री मल्टीस्टेट को. ऑप. सोसायटी, मंगळवेढा सोलापूर व मुख्य कार्यकारी अधिकारी, सीताराम महाराज साखर कारखाना मर्या. खर्डी) यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून बँकेचे अध्यक्ष मा. श्री. मनीष प्रकाश दळवी आणि उपाध्यक्ष मा. श्री. अतुल सुधाकर काळसेकर यांची उपस्थिती असणार आहे.यासोबतच बँकेचे अन्य मान्यवर उपस्थित राहतील, त्यांची नावे खालीलप्रमाणे: मा. श्री. विद्याधर रविंद्रनाथ परब, संचालक. मा. श्री. गजानन सुमंत गावडे, संचालक.मा. श्री. महेश रमेश सारंग, संचालक.मा. श्री. रविंद्र मनोहर मडगावकर, संचालक.
मा. श्री. प्रमोद रामचंद्र गावडे, अध्यक्ष, सावंतवाडी तालुका सह. खरेदी विक्री संघ लि.मा. श्रीम. वनिता विजय मेस्त्री, सरपंच, ग्रामपंचायत तळवडे.मा. श्री. बाबुराव दत्ताराम परब, अध्यक्ष, तळवडे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था लि.मा. श्री. विलास काशिनाथ परब, अध्यक्ष, तळवडे अर्बन को. ऑप. क्रेडिट सोसायटी लि ,प्रमोद म. गावडे, प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी हे उपस्थित राहणार आहेत.
सिंधुदुर्ग बँकेच्या वतीने, तळवडे शाखेच्या या स्थलांतर सोहळ्यास ग्राहक ,व्यापारी तसेच सर्व ग्रामस्थ यांनी उपस्थित राहून हा शाखा स्थलांतर सोहळा अधिक दिमाखदार करावा, असे आवाहन करण्यात आले आहे . असे आवाहन सर्व संचालक मंडळ व प्रमोद म. गावडे, प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., सिंधुदुर्ग तळवडे शाखा व्यवस्थापक श्यामसुंदर पोकळे यांनी केले आहे.”







