ठळक घडामोडी

राजे प्रतिष्ठानच्या सावंतवाडी कार्यालयात ‘शिवराज्याभिषेक दिन’ उत्साहात साजरा!

राजे प्रतिष्ठानच्या सावंतवाडी कार्यालयात ‘शिवराज्याभिषेक दिन’ उत्साहात साजरा!


सावंतवाडी:
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून, ‘राजे प्रतिष्ठान’च्या वतीने सावंतवाडी येथील कार्यालयात शिवराज्याभिषेक दिन अत्यंत उत्साही आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित पदाधिकारी व शिवप्रेमींनी शिवरायांच्या जाज्वल्य इतिहासाला उजाळा दिला. महाराजांचे लोककल्याणकारी विचार आणि आदर्शांवर चालण्याचा दृढ संकल्प यावेळी सर्वांनी व्यक्त केला. तसेच शिवरायांचा पराक्रम, त्यांची दूरदृष्टी आणि आदर्श राज्यकारभाराचा गौरवही याप्रसंगी करण्यात आला.
या सोहळ्याला राजे प्रतिष्ठान कामगार सेना जिल्हाध्यक्ष संतोष तळवणेकर, सचिव रामचंद्र कुडाळकर, प्रवक्ते रमाकांत गावडे, सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क प्रमुख शिवा गावडे, अनिल सावंत, शरद सावंत, काका भुते, राजन रेडकर, अक्षता कुडतरकर, रंजना रेडकर, प्रणिला सावंत यांच्यासह प्रतिष्ठानचे बहुसंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.