ठळक घडामोडी

विजवीतरणच्या हलगर्जीपणामूळे मळगाव ब्रांम्हणपाट येथील गोपाळ सदाशीव सातार्डेकर यांच्या गायीचा झाला मृत्यू

सावंतवाडी

विजवीतरणच्या हलगर्जीपणामूळे मळगाव ब्रांम्हणपाट येथील गोपाळ सदाशीव सातार्डेकर यांच्या गायीचा मृत्यू दोन दिवसापूर्वी शेतात चाराखात असताना अचानक शाॅक लागल्याने जागीच मृत्यू झाला .

महावीतरणच्या हलगर्जीपणामूळे पोलवरील लाईन तूटून खाली शेतात पडल्याची तक्रार देउनही वेळीच उपाययोजना न झाल्यामूळे शेतकरी गोपाळ सातार्डेकर यांचे मोठे आर्थीक नुकसान झालेआहे .याप्रसंगी ग्रामस्थानी आक्रमक भुमीका घेउन महावितरणच्या अधिकार्‍यांना ताबडतोब बोलाउन घेउन त्याना चांगलेच धारेवर धरले व संबंधीत शेतकर्‍याला तातडीने नुकसानभरपायी द्या याकरता आपण काय करणार असे विचारल्यावर अधिकार्‍यांनी पंधरा दिवसात नुकसानभरपायी मिळउन देण्याचे आश्वासन दिल्यावर ग्रामस्थांनी शांततेची भूमिका घेतली.

मळगाव गावातील लोकांनी दिलेल्या तक्रारीपैकी एकही काम तूमच्याकडू झालेल नाही वर्षानूवर्षे ग्राहक तक्रारी देतात परंतू महावीतरण कंपनी एकाही तक्रारीची दखल घेत नाही अशा अनेक समस्यांचा पाढा वाचला त्यावर ब्रांम्हणपाटमधील ज्या काही समस्या असतील त्या दोनदिवसात पुर्णकरून घेउ असे सांगीतले.यावेळी पशुवैध्यकीय अधिकारी पोलीस कर्मचारी यांनी सर्व रितसर सोपस्कार पुर्ण केले.