ठळक घडामोडी

तळवडे ठिकाणीं रानभाज्यांचे महत्त्व अधोरेखित करणारा आगळावेगळा उपक्रम संपन्न

रानभाज्यांचे महत्त्व अधोरेखित करणारा आगळावेगळा उपक्रम संपन्न

तळवडे (ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग), दि. 3 ऑगस्ट २०२५:


“रानभाज्यांचे प्रदर्शन व पाककृती स्पर्धा” या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत हॉल, तळवडे येथे करण्यात आले. या कार्यक्रमात रानभाज्यांचे पोषणमूल्य, आरोग्यदायी फायदे आणि ग्रामीण भागातील स्वयंपाकातील महत्त्व यावर प्रकाश टाकण्यात आला.

उद्यान विद्यामहाविद्यालय, मुळदेचे सहयोगी अधिष्ठाता मा. डॉ. विजय दळवी सर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत रानभाज्या प्रदर्शन आणि पाककृती स्पर्धा घेण्यात आले.
या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती सरपंच मा.वनिता मेस्त्री,दादा परब,नम्रता गावडे (ग्रामपंचायत सदस्य) डॉ. मा.महेश शेडगे (साहाय्यक प्रध्यापक),डॉ मा.गिरीश उईके (साहाय्यक प्रध्यापक ),माजी सरपंच मा.रवींद्र काजरेकर सर (परीक्षक ).
या उपक्रमामागील मुख्य हेतू रानभाज्यांचा वापर वाढवून पोषणमूल्यांची जाणीव निर्माण करणे आणि स्थानिक खाद्यसंस्कृती जपणे हा होता.