
मालवण नगरपरिषदेवर ‘राणे’ करिष्मा; १० जागांसह शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व
मालवण:
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या मालवण नगरपरिषद निवडणुकीत आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाचा करिश्मा पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे. या निवडणुकीत शिवसेनेने २० पैकी १० जागांवर विजय मिळवत पालिकेवर आपले निर्विवाद बहुमत प्रस्थापित केले आहे. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीतही शिवसेनेच्या उमेदवार सौ. ममता मोहन वराडकर यांनी बाजी मारली आहे.
नगराध्यक्ष पदाचा निकाल
नगराध्यक्ष पदाच्या चुरशीच्या लढतीत शिवसेनेच्या सौ. ममता वराडकर यांनी १०२२ मतांच्या फरकाने मोठा विजय मिळवला. त्यांच्या विरोधात रिंगणात असलेल्या प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते
खालीलप्रमाणे आहेत:
उमेदवार | पक्ष | मते
सौ. ममता मोहन वराडकर शिवसेना | ४२०१ (विजेत्या)
सौ. पूजा प्रमोद करलकर शिवसेना (ठाकरे गट) | ३१७९
| सौ. शिल्पा यतीन खोत | भाजप | ३१५४ |
पक्षीय बलाबल आणि महत्त्वाचे निकाल
मालवणच्या विकासासाठी आमदार निलेश राणे यांनी अल्पावधीत आणलेला शेकडो कोटींचा निधी आणि त्यांचे नेतृत्व यावर मालवणकरांनी शिक्कामोर्तब केले आहे.शिवसेना: १० जागांसह सत्ता काबीज. भाजप: ५ जागांवर विजय.
शिवसेना (ठाकरे गट): ४ जागा जिंकून शहरात अस्तित्व टिकवले. अपक्ष: १ जागा (सुदेश आचरेकर).
विशेष लक्षवेधी ठरले ते माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांचे यश. भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी प्रभाग ७ ‘अ’ मधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि विजय मिळवून आपणच मालवणचे ‘किंगमेकर’ असल्याचे संकेत दिले आहेत.







