ठळक घडामोडी

संस्कार नॅशनल स्कूल मध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिन उत्साहात साजरा

सावंतवाडी

संस्कार नॅशनल स्कूल निरवडे येथे आंतरराष्ट्रीय योगादिन सर्वाच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी योगा दिनाला उपस्थित होते.शाळेचे मुख्याध्यापक मा. हेमंत तानावडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यांनी मुलांना योगा दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच शाळेचे अध्यक्ष मा. नरपत जैन सर ,संस्थेचे माजी अध्यक्ष मा.शेखर जैन सर यांनी ही मुलांना योगा दिनाच्या शुभेच्छा दिल्या व रोजच्या जीवनात योगा करण्यासाठी प्रोत्साहन दिले. शाळेच्या शिक्षिका ममता वैद्य ,प्राची केरकर,हर्षदा खवणेकर यांनी मुलांना योगाभ्यास शिकवला. शाळेतील विद्यार्थ्यांनीहि मोठ्या उत्साहाने शिकवलेला योगाअभ्यास पूर्ण केला. शाळेच्या शिक्षिका सौ .धनश्री तुळसकर यांनी योगाचे महत्त्व मुलांना सांगितले. सिमरन शेख यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर सौ. प्रियांका शिरसाट यांनी आभार मानले.अशाप्रकारे संस्कार नॅशनल स्कूल मध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.