देवीदास आडारकर यांच्याकडून राज्य सरकार व रेल्वे प्रवाशी संघटना याचे केले कौतुक आणि अभिनंदन
सावंतवाडी नगरपरिषद कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियन (सिंधुदुर्ग जिल्हा) चे कार्याध्यक्ष

सावंतवाडी:
कोकण रेल्वेचे स्वप्न सत्यात उतरवणारे शिल्पकार आणि देशाचे माजी रेल्वेमंत्री प्रा. मधु दंडवते यांचा राज्य सरकारकडून मोठा सन्मान करण्यात आला आहे. सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे नाव बदलून ते “लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस” करण्याच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाच्या (कॅबिनेट) बैठकीत अधिकृत मंजुरी देण्यात आली आहे. राज्य सरकारकडून आता हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवला जाणार आहे.
संपूर्ण तालुक्यात आनंदोत्सव; फटाक्यांची आतिषबाजी
कोकणातील जनता आणि रेल्वे प्रवासी संघटनेची ही अनेक वर्षांची प्रलंबित मागणी अखेर मान्य झाली आहे. या ऐतिहासिक निर्णयाचे वृत्त समजताच मंगळवारी सावंतवाडी शहरासह संपूर्ण तालुक्यात फटाक्यांची आतिषबाजी करत आणि पेढे वाटून जोरदार आनंदोत्सव साजरा करण्यात आला. सर्वसामान्य जनतेमधून आणि रेल्वे प्रवाशांमधून या निर्णयाचे उत्स्फूर्त स्वागत होत आहे.

देवीदास आडारकर यांच्याकडून कौतुक आणि अभिनंदन
सावंतवाडी नगरपरिषद कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियन (सिंधुदुर्ग जिल्हा) चे कार्याध्यक्ष श्री. देवीदास आडारकर यांनी राज्य सरकारच्या या निर्णयाचे जाहीर कौतुक केले आहे. कोकण रेल्वेच्या उभारणीत प्रा. मधु दंडवते यांचे योगदान अतुलनीय होते, असे सांगत त्यांनी या निर्णयाबद्दल सर्वांचे अभिनंदन केले आहे. रेल्वे प्रवाशी संघटना यांनी या करता मोठी मेहनत घेतली गेली अनेक वर्षे जनतेची मागणी होती.केंद्र सरकारच्या अंतिम मंजुरीकडे लक्ष
राज्य मंत्रिमंडळाने या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवल्यामुळे आता चेंडू केंद्र सरकारच्या कोर्टात गेला आहे. राज्य सरकारकडून हा प्रस्ताव तातडीने दिल्लीला पाठवला जाणार असून, केंद्र सरकारकडून यावर कधी अंतिम शिक्कामोर्तब होते, याकडे आता संपूर्ण कोकणवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे. या निर्णयामुळे प्रा. मधु दंडवते यांच्या स्मृतींना आणि त्यांनी कोकण रेल्वेसाठी घेतलेल्या कष्टांना खऱ्या अर्थाने उजाळा मिळाला आहे, अशा भावना सर्वस्तरातून व्यक्त होत आहेत.
बातमी संकलन व जाहिरातींसाठी संपर्क: ९७६३२३०८१४







