ठळक घडामोडी

इन्सुली पंचायत समिती मतदार संघातुन श्री शिवा गावडे उमेदवारीसाठी इच्छुक

इन्सुली पंचायत समिती मतदार संघातुन श्री शिवा गावडे उमेदवारीसाठी इच्छुक
भारतीय जनता पार्टीकडे केला उमेदवारी मागणी अर्ज

सावंतवाडी
अलीकडेच सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर सावंतवाडी शहरातील शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केलेले श्री शिवा गावडे यांनी भाजप पक्षांकडे इन्सुली पंचायत समिती साठी उमेदवारी मिळावी अशी मागणी केली आहे

.तशी त्यांच्या कार्यकर्त्यांची आग्रही भूमिका आहे
समाज कार्याची आवड असलेले गावडे यांनी कॉग्रेसच्या सावंतवाडी तालुकाउपाध्यक्ष पदावर काम केलेले असून सप्तसिंघु सेवा प्रतिष्ठान चे विद्यमान अध्यक्ष व राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र सिंधुदुर्ग चे ते जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून त्यांनी जिल्हयात तसेच तालुक्यात त्यांचा सामाजकार्य तसेच सामाजिक उपक्रम राबवून संघटन बाधणी उत्तम प्रकारे केली. तसेच कोरोना काळात त्यांच्या संघटनेने विविधी समाज उपयोगी उपक्रम म्हणजे जिवनावश्यक वस्तुचे वाटप आर्थिक मदत रक्तदान शिबीर अशी कार्य केले राजे प्रतिष्ठान कामगार सेना संस्थापक अध्यक्ष खासदार श्रीमंत उदयनराजे भोसले महाराज साहेब यांचे ते निकटवर्तीय मानले जातात. विविध संघटनांच्या माध्यमातून त्यांचे समाज कार्याचे योगदान जिह्यात तसेच तालुक्यात उत्तम प्रकारे सुरु आहे त्यांच्या असख्य कार्यकर्त्यांसह मित्र परिवारची इच्छा आहे की त्यांना आगामी होवू घातलेल्या जि.प. किंवा पचायत समिती निवडणुकीत श्री शिवा गावडे यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीकडे करण्यात आली आहे. पार्टीने संधी दिल्यास आपण निश्चीतच निवडणुक रिंगणात उतरणार संधीच सोन करणार असे शिवा गावडे यांनी म्हटले आहे