भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना देसाई यांनी उपसरपंच यशवंत कापडी यांचे केले अभिनंदन
पालकरवाडी उपसरपंच सौ.उमा करंगुटकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली . यावेळी भाजप चे यशवंत कापडी यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे निवडणूक अधिकारी विजय सावंत यांनी त्यांची निवड जाहीर केली .
यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळू देसाई , ता. सरचिटणीस बाबली वायंगणकर यांनी पुष्पगुच्छ देऊन यशवंत कापडी यांचे अभिनंदन केले.
भाजपची सत्ता असलेल्या पालकरवाडी ग्रा. प. ची उपसरपंच निवड शुक्रवारी झाली. यावेळी सरपंच बंड्या पाटील , सूर्याजी नाईक, माजी उपसरपंच उमा करंगुटकर , नंदिता शेर्लेकर , शुभदा गोसावी , नारायण शेर्लेकर , आबा येरम , भाऊ गावडे , दीपक करांगुटकर , समीर गोसावी , विकास अन्सुरकर , संगीता परब , दीपक मोहिते , दिनकर पालव , दर्शना पालकर उपस्थित होते







