शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये सुयश: कुमार प्रतीक बोवलेकरचा आडेली पंचायत समिती मतदारसंघाचे सदस्य श्री. नितीनजी मांजरेकर यांनी केला विशेष सत्कार
आडेली:
राज्यस्तरीय शूटिंग चॅम्पियनशिपमधील ५० मीटर प्रोन इव्हेंटमध्ये घवघवीत यश संपादन करणाऱ्या कुमार प्रतीक सुभाष बोवलेकर याचा नुकताच त्याच्या राहत्या घरी सत्कार करण्यात आला. या स्पर्धेत ६०० पैकी ५५६ गुण मिळवत त्याने राज्यात चौथा क्रमांक पटकावून आपल्या यशाचा ठसा उमटवला आहे.
यावेळी त्याचा विशेष सत्कार करण्यात आलाव त्यांच्या या कामगिरीचे कौतुक केले. या वेळी आडेली पंचायत समिती मतदारसंघाचे सदस्य श्री. नितीनजी मांजरेकर, बूथ अध्यक्ष श्री. अनिल तेंडोलकर, श्री. महेश धुरी, श्री. रवींद्र खानोलकर, श्री. प्रदीप उर्फ पप्पू मटकर, मार्गदर्शक श्री. रंजन कडूलकर आणि बाळासाहेब ठाकरे शिवसेना कार्यकर्ते श्री. उमेश नाईक उपस्थित होते.
प्रतीकच्या या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. या आनंददायी प्रसंगी प्रतीकचे वडील आणि मठ सोसायटीचे चेअरमन श्री. सुभाष बोवलेकर, सौ. समिधा बोवलेकर आणि बंधू पवन बोवलेकर हे देखील उपस्थित होते.







