तळवडे गेट-बाजारपेठ येथे ‘व्यापारी संघ तळवडे’तर्फे भव्य ‘दिपोत्सव कार्यक्रम २०२५’
तळवडे:
दिपावलीच्या मंगलमय पर्वावर ‘व्यापारी संघ तळवडे’ यांच्या वतीने तळवडे गेट-बाजारपेठ येथे दिपोत्सव कार्यक्रम २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने दोन दिवसीय दशावतार नाट्यप्रयोगांची मेजवानी नाट्य रसिकांना मिळणार आहे.
कार्यक्रमाची रूपरेषा:
- मंगळवार, दिनांक २१ ऑक्टोबर २०२५ (लक्ष्मी पूजनानिमित्त):
- सायंकाळी ०७ वाजता
- श्री. भास्कर वैद्य प्रस्तुत ‘जय संतोषिमाता दशावतार नाट्य मंडळ, मातोंड पेंडूर’ यांचा गाजलेला नाट्यप्रयोग ‘राजा मणिध्वज माया सुंदरी’ सादर होणार आहे.
- बुधवार, दिनांक २२ ऑक्टोबर २०२५ (दिवाळीनिमित्त):
- सायंकाळी ०७ वाजता
- श्री. बंड्या गोवेकर प्रस्तुत ‘अष्टविनायक दशावतार नाट्य मंडळ, निरवडे’ यांचा नाट्यप्रयोग ‘मायाजाल’ सादर होईल.
या दिपोत्सव कार्यक्रमाचा लाभ सर्व नाट्य रसिकांनी घ्यावा, असे आवाहन ‘व्यापारी संघ तळवडे’ यांनी केले आहे.
कार्यक्रमाचे ठिकाण तळवडे गेट-बाजारपेठ असणार आहे.








