ठळक घडामोडी

‘माझा गणराया’ घरगुती गणेश सजावट व्हिडिओ स्पर्धेचे आयोजन-महासिंधुकिरण न्यूज चॅनेल व राजे प्रतिष्ठाव कामगार सेना सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा; विजेत्यांना रोख रक्कम व सन्मानचिन्ह

📰 ‘माझा गणराया’ घरगुती गणेश सजावट व्हिडिओ स्पर्धेचे आयोजन

महासिंधुकिरण न्यूज चॅनेल व राजे प्रतिष्ठाव कामगार सेना सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा; विजेत्यांना रोख रक्कम व सन्मानचिन्ह

सिंधुदुर्ग : प्रतिनिधी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घरगुती गणेश सजावटीला प्रोत्साहन देण्यासाठी ‘माझा गणराया – गणेश सजावट व्हिडिओ स्पर्धा २०२६’ आयोजित करण्यात आली आहे. महासिंधुकिरण न्यूज चॅनेल व राजे प्रतिष्ठाव कामगार सेना, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मोबाईलमध्ये आपल्या घरातील गणेश सजावटीचा २ ते ३ मिनिटांचा व्हिडिओ तयार करून पाठवायचा आहे. व्हिडिओ पाठवताना केंद्रस्थानी असलेल्या व्यक्तीने आपले नावही पाठवणे आवश्यक आहे.

स्पर्धेतील विजेत्यांसाठी आकर्षक पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. प्रथम क्रमांकासाठी ₹३,५००, द्वितीय क्रमांकासाठी ₹२,५०० तर तृतीय क्रमांकासाठी ₹१,५०० रोख रक्कम, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.

दररोज जास्तीत जास्त दिवस सहभागी स्पर्धकांच्या व्हिडिओला विजेता ठरवण्याचा निकष ठेवण्यात आला आहे. गणेश सजावटीतील कल्पकता, आकर्षक मांडणी आणि भक्तिमय वातावरण या माध्यमातून आपल्या गणरायाची सजावट अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी या स्पर्धेतून मिळणार आहे.

स्पर्धेतील व्हिडिओ पाठवल्यानंतर व्हायरल मुदत २१ दिवस राहणार आहे. विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक वितरणाची तारीख यापूर्वी कळविण्यात येणार आहे. सहभागी सर्व स्पर्धकांना डिजिटल सन्मानपत्र देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रवेश फी ₹४५० ठेवण्यात आली आहे. इच्छुकांनी लवकरात लवकर सहभाग नोंदवून आपल्या घरातील आकर्षक गणेश सजावटीचा व्हिडिओ पाठवावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

📱 अधिक माहितीसाठी संपर्क

9763230814 | 9422435762 | 9403339103

📲 व्हिडिओ पाठवण्यासाठी WhatsApp

9763717761

💳 Google Pay

9763230817

“बाप्पाच्या सजावटीतून दिसू द्या आपली श्रद्धा, संस्कृती आणि सर्जनशीलता!”

|| गणपती बाप्पा मोरया ||