सावंतवाडी -रामचंद्र कुडाळकर
सोनुर्ली येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा सोनूर्ली नंबर १ चा विद्यार्थी कु. यश नागेश गावकर याने उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (इयत्ता ५ वी) उत्कृष्ट कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले आहे. त्याने या परीक्षेत २१० गुण मिळवून शिष्यवृत्तीधारक होण्याचा बहुमान मिळवला असून, जिल्हा ग्रामीण गुणवत्ता यादीत ६७ वे स्थान पटकावले आहे. त्याच्या या यशामुळे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.
यशला लाभलेल्या या यशात त्याच्या वर्गशिक्षिका श्रीम. रोशनी रोशन राऊत यांचे मोलाचे मार्गदर्शन, तसेच त्याच्या पालकांचे मोलाचे सहकार्य व प्रोत्साहन लाभले.
यशस्वी विद्यार्थी, शिक्षक व पालकांचे कौतुक
या परीक्षेत यश गावकर याच्यासोबतच शाळेतील इतर पात्र विद्यार्थी कु. गौरांग गावकर, कु. नितीन सावंत आणि कु. भगवान पाल्येकर यांनीही उल्लेखनीय कामगिरी केली.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे आणि विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या शाळेतील शिक्षकवृंद श्रीम. सृष्टी धुरी, श्रीम. रोशनी राऊत, श्रीम. समृद्धी सोनुर्लेकर व श्री. रोहित गणपुले यांचे शाळा व्यवस्थापन समिती सोनूर्ली नं. १ कडून विशेष अभिनंदन करण्यात आले.
तसेच आजगाव प्रभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी तथा मळगाव केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. शिवाजी गावीत यांनीही सोनूर्ली शाळेला भेट देऊन यशस्वी विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक आणि पालकांचे तोंडभरून कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. आमदारांसह गावातील प्रमुख ग्रामस्थांकडूनही या यशाबद्दल आनंद व्यक्त केला जात आहे. यावेळी यावेळी यश गावकर याचे वडील नागेश गावकर इतर पालक या कार्यक्रम वेळी उपस्थित होते.







