सावंतवाडी नगरपरिषद निवडणूक: शिंदे शिवसेनेच्या नगरराध्यक्षपदाच्या उमेदवाराला सकारात्मक प्रतिसाद
अँड. नीता सावंत-कविटकर यांच्या प्रचाराला नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद
सावंतवाडी
सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीत शिंदे शिवसेनेच्या नगरराध्यक्षपदाच्या उमेदवाराला अँड. नीता सावंत-कवळेकर यांच्या प्रचाराला नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. आमदार दीपक केसरकर स्वतः या निवडणूक प्रक्रियेमध्ये सक्रिय झाले आहेत.
👉 जोरदार प्रचार आणि जनसंपर्क:
- सावंतवाडीतील विविध प्रभागांत घरोघरी जाऊन, वैयक्तिक संवाद साधून, आणि महिला-युवकांचा सक्रिय सहभाग घेत शिंदे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार प्रचार सुरू ठेवला आहे.
- या सर्व पार्श्वभूमीवर नीता सावंत-कवळेकर यांनी नगरराध्यक्षपदाच्या सरळ लढतीत आघाडी घेतल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.
प्रचाराचा वेग वाढला:शहरात झालेल्या प्रचारमोहिमेत शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.सकाळपासूनच शिवसेना पदाधिकारी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या, युवासेनेचे आणि स्थानिक नागरिकांनी विविध प्रभागांत कॅनव्हॉसिंग करून सावंत-कवळेकर यांच्यासह नगरसेवकांच्या उमेदवारांना मोठा उत्साह आणि साथ दिलीप्रचारानंतर मतदारांनी विकास आणि शहराचा कारभार हाच केंद्रबिंदू असल्याचे मत व्यक्त केले आहे. नीता सावंत-कवळेकर यांचा सखोल अभ्यास आणि लोकांशी असलेला थेट संपर्क यामुळे आपला विजय निश्चित असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.महिलांकडून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असून, युवावर्गही या प्रचारात मोठ्या जोमाने सहभागी होत आहे.







