ठळक घडामोडी

वेंगुर्ला तालुक्यांतील पेंडूर-मातोंड गावचा ३६० चाळयांचा अधिपति श्री देव घोडेमुख देवाचा कोंब्याचा वार्षिक जत्रोत्सव उदया २५नोव्हेंबर रोजी

वेंगुर्ला तालुक्यांतील पेंडूर-मातोंड गावचा ३६० चाळयांचा अधिपति श्री देव घोडेमुख देवाचा कोंब्याचा वार्षिक जत्रोत्सव उदया २५नोव्हेंबर रोजी

वेंगुर्ला/पेंडूर-मातोड:

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यात, पेंडूर-मातोड गावाच्या उंच डोंगरमाथ्यावर वसलेले जागृत देवस्थान, ३६० चाळयांचा अधिपति श्री देव घोडेमुख देवाचा वार्षिक जत्रोत्सव उद्या २५ नोव्हेंबर२०२५रोजी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. हा जत्रोत्सव ‘कोंब्या’चा जत्रोत्सव म्हणून संपूर्ण कोकणात प्रसिद्ध आहे.
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान
श्री देव घोडेमुख हे नवसाला पावणारे जागृत दैवत मानले जाते. त्यामुळे दरवर्षी या वार्षिक सोहळ्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. ज्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात, असे भक्तगण सालाबादप्रमाणे कोंबा अर्पण करून आपले नवस फेडतात.
जत्रोत्सवाच्या दिवशी सकाळपासूनच उंच डोंगरमाथ्यावर वसलेल्या या देवस्थानाकडे भक्तगण दर्शनासाठी गर्दी करतात. धार्मिक रूढी-परंपरा पूर्ण झाल्यानंतर देवाच्या दर्शनाला सुरुवात होते.

  • नवस फेडण्याची पद्धत: हजारो भक्तगण कोंब अर्पण करून आपले नवस फेडतात. याव्यतिरिक्त नारळ आणि केळी अर्पण करण्याचीही प्रथा आहे.
  • आजारातून मुक्तीसाठी: विशेषतः, ज्या भक्तांची गंभीर आजारपणे दूर होतात, असे भाविक शरीराच्या अवयवांचे मातीचे प्रतीक अर्पण करून नवस फेडतात. हे कोकणातील या जागृत देवस्थानाचे वैशिष्ट्य आहे.
    हा कोंब्याचा जत्रोत्सव केवळ एक धार्मिक विधी नसून, कोकणातील लोकांची या दैवतावरील असलेली अलोट श्रद्धा आणि अतूट भक्तीचे हे प्रतीक आहे. असे हे जागृत देवस्थान आहे.