सिंधुदुर्ग : भाजप युवा नेते मा. श्री. विशाल प्रभाकर परब यांनी राष्ट्रीय छावा संघटना व राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष तळवणेकर यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले.
यावेळी गणरायाची पूजा-अर्चा करून सर्वांच्या सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करण्यात आली. गणेशोत्सवाच्या भक्तिमय वातावरणात उपस्थितांनी श्री गणरायाचे आशीर्वाद घेतले.
या प्रसंगी अॅड. नगरसेवक सिद्धार्थ भांबुरे, धीरेंद्र मापसेकर, साईनाथ जामदार, शिवराज, यशश्री, निधी, अर्णव आणि मृण्मयी तळणेकर यांची उपस्थिती होती.
🙏 गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! 🚩








