तळवडे
श्री पूर्वीदेवी मंदिर तळवडे आंबाडेवाडी येथे श्रावण मासाचे औचित्य साधून उद्योजक राजाराम गावडे आणि परिवार यांच्यावतीने रविवार १८ ॲागस्ट रोजी श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे.त्यानिमित्त रात्री ८ वाजता डबलबारी भजनाचा जंगी सामना होणार आहे.यात श्री हनुमान प्रासादिक भजन मंडळ,कुडाळ बुवा श्री विजय उर्फ गुंडु सावंत ( पखवाजसाथ विराज बावकर ,तबला सागर कदम ) विरुद्ध श्री वडचीदेवी प्रासादिक भजन मंडळ,देवगड बुवा संदिप लोके ( पखवाजसाथ योगेश सामंत,तबला संदेश सुतार ) यांना साथ देणार आहे.








