सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदाचा तात्पुरता कार्यभार विलास गावडे यांच्याकडे
सिंधुदुर्ग,
- सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. इर्शाद शेख हे आजारपणामुळे औषधोपचारासाठी बाहेरगावी गेले असल्याने त्यांच्या अनुपस्थितीत जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा प्रभार ज्येष्ठ उपाध्यक्ष श्री. विलास गावडे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
या संदर्भातील आदेश महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष अँड. गणेश पाटील यांनी आज, दि. १२ ऑक्टोबर २०२५ रोजी जारी केला.
हा आदेश मा. प्रांताध्यक्ष श्री. हर्षवर्धन सपकाळ यांच्या सूचनेवरून देण्यात आला असून, पुढील आदेश येईपर्यंत श्री. गावडे जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळतील.
या आदेशाची प्रत सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्री. इर्शाद शेख यांनाही पाठविण्यात आली आहे.
जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, “अनुभवी नेतृत्वामुळे जिल्हा काँग्रेस संघटनेला नवचैतन्य मिळेल,” अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
प्रदेश काँग्रेसच्या मुख्यालय ‘टिळक भवन’, दादर (मुंबई) येथून ही अधिसूचना जारी करण्यात आली असून, संपर्क क्रमांक व ई-मेलद्वारे संबंधितांना अधिकृत माहिती देण्यात आली आहे.







