ठळक घडामोडी

तळवडे येथील श्री जनता विद्यालयाचा १२ वीचा निकाल ७५%

तळवडे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता १२ वी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, श्री जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, तळवडे (ता. सावंतवाडी) या विद्यालयाचा निकाल ७५% लागला आहे.
विद्यालयातून एकूण २० विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी १५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

परीक्षेत प्रथम पाच क्रमांक मिळवून यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत:

  • प्रथम क्रमांक: कु. प्रियांका आनंद भागवत (५४५ गुण, ९०.८३%),द्वितीय क्रमांक:** कु. वैष्णवी आनंद रेडकर (४०५ गुण, ६७.५०%),तृतीय क्रमांक:** कु. श्रेया पंढरीनाथ रेडकर (३४२ गुण, ५७.००%),चतुर्थ क्रमांक:** आदिनाथ अशोक गावडे (३१७ गुण, ५२.८३%),पंचम क्रमांक:** रजत बबन काळे (३१० गुण, ५१.६७%),विद्यालयातील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे. तळवडे शिक्षण प्रसारक मंडळचे अध्यक्ष संचालक मंडळ याच्यावतीने सर्व यशस्वी विद्यार्थी याचे अभिनंदन करण्यात आले आहे.