सावंतवाडी
“मातृत्वाचा गौरव आणि कर्तृत्वाचा सन्मान…”
संस्कार नॅशनल स्कूल निरवडेत रंगला महिला दिनाचा सोहळा.

संस्कार नॅशनल स्कूल, निरवडे येथे जागतिक महिला दिन अत्यंत उत्साहात आणि चैतन्यमय वातावरणात साजरा करण्यात आला. महिलांच्या सन्मानासाठी आणि त्यांच्या समाजातील योगदानाची दखल घेण्यासाठी शाळेने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि सरस्वती मातेच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. या कार्यक्रमासाठी सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या PSI श्रीमती माधुरी मुळीक मॅडम प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमला उपस्थित होत्या. विविध क्षेत्रातील मान्यवर महिला,डॉ. संगीता पटेल, डॉ. अर्चना सावंत, डॉ. भक्ती भिसे मॅडम, तसेच ओंकार प्रिंटर्स च्या निगुडकर मॅडम तसेच माता पालक समितीच्या उपाध्यक्ष श्रीम. ऋतुजा मुळीक मॅडम तसेच माता पालक संघाच्या सदस्य माता उपस्थित होत्या.शाळेतील शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि उपस्थित माता पालकांचा शाल – श्रीफळ आणि गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
प्रशालेतील विद्यार्थिनींनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून आई, बहीण, शिक्षिका आणि समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या स्त्रियांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.तसेच महिलाच्या शौर्याची गाथा सांगणाऱ्या कविताचेही वाचन केले. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या प्रमुख पाहुण्या श्रीमती माधुरी मुळीक मॅडम यांनी महिलांच्या हक्क आणि कर्तव्यावर प्रकाश टाकला. आजच्या युगात स्त्री ही केवळ चूल आणि मुलांपुरती मर्यादित नसून ती आकाशाला गवसणी घालत आहे, असे विचार त्यांनी मांडले. सर्व विद्यार्थिनी समाजातील वाईट गोष्टी सोडून आपल्या आई वडिलांशी प्रत्येक गोष्ट शेअर करणे, चांगल्या वाईट गोष्टी ओळखण्यास शिकले पाहिजे आणि मुख्य म्हणजे यासाठी स्वतः ला ओळखण्याची आणि सिद्ध करण्याची गरज आहे असे प्रतिपादन त्यांनी केले. माता पालक संघाच्या सदस्य श्रीमती डॉ. संगीता पटेल मॅडम यांनी मुलींना आवाहन केले की एक मुलगी म्हणून स्वतः चा अभिमान बाळगा तसेच स्त्रीने आपल्या स्त्रित्वावर प्रेम केले पाहिजे. तसेच उपस्थित विद्यार्थ्यांना त्यांनी आवाहन केले की तुमच्या घरातील आई, बहीण, आजीआणि इतर सर्व स्त्रियांना त्यांच्या कामाची पावती म्हणून फक्त्त प्रेम दया. याव्यतिरिक्त जास्त अपेक्षा कोणत्याही आईची नाही. शाळेच्या मुख्याध्यापिकांनीही सर्व महिला कर्मचाऱ्यांचे शाळेच्या प्रगतीमधील योगदान अधोरेखित केले.
“स्त्री ही घराचा पाया आहे आणि जेव्हा हा पाया भक्कम होतो, तेव्हाच समाज आणि राष्ट्र प्रगत होते.”
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये महिलांबद्दल आदराची भावना निर्माण होण्यास मदत झाली.







