
संस्कार नॅशनल स्कूल, निरवडे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा
निरवडे :
संस्कार नॅशनल स्कूल, निरवडे येथे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भारताचे महान शिक्षणतज्ज्ञ व माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
याप्रसंगी दर्शन विद्या एज्युकेशन सोसायटी, ठाणेचे चेअरमन डॉक्टर शेखर जैन यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांप्रती आदर व कृतज्ञता व्यक्त करत विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. विद्यार्थ्यांनी कविता, भाषणे, गीते व मनोगतांच्या माध्यमातून शिक्षकांचे जीवनातील महत्त्व अधोरेखित केले.
विद्यार्थ्यांनी शिक्षकांना शुभेच्छा देऊन त्यांच्याविषयी आपली कृतज्ञता व्यक्त केली. शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य दिशा देणारे मार्गदर्शक असून त्यांच्या कार्याचा गौरव करण्याचा हा दिवस असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या कार्यक्रमामुळे शिक्षक व विद्यार्थ्यांमधील जिव्हाळ्याचे नाते अधिक दृढ झाले. संस्थेचे चेअरमन डॉक्टर शेखर जैन सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शिक्षकांचे महत्त्व विशद केले, याप्रसंगी व्यासपीठावर प्रशालेचे समन्वय श्री अजय बांदेकर, मुख्याध्यापिका श्रीमती प्रणाली रेडकर शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. सर्वांच्या सहकार्याने शिक्षक दिनाचा कार्यक्रम अत्यंत आनंदी व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.







