ठळक घडामोडी

पालकमंत्री नितेश राणे शनिवारी सिंधुदुर्ग दौऱ्यावर

ओम गणेश निवासस्थानी घेणार जनतेच्या गाठीभेटी

कणकवली :

राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे शनिवार, दि. २५ जुलै रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

दौऱ्यादरम्यान सकाळच्या सत्रात ते कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी नागरिकांच्या गाठीभेटी घेणार असून, विविध प्रश्न व मागण्यांबाबत जनतेशी थेट संवाद साधणार आहेत. त्यानंतर जिल्ह्यात नियोजित असलेल्या विविध शासकीय व सार्वजनिक कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

या दौऱ्यामुळे जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा तसेच नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यास प्राधान्य दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.