सार्वजानिक बांधकाम विभागने तात्काळ गटार साफ करावी
तळवडे होडावडे पुलावर पाणी आल्याने वेंगुर्ला सावंतवाडी वाहतूक सकाळी ५ तास ठप्प
सावंतवाडी तालुक्यातील तळवडे बाजारपेठ मध्ये गटार नसल्याने मुसळधार पाऊसाचे पाणी शिरले बाजारपेठमध्ये
सार्वजानिक बांधकाम विभागने तात्काळ गटार साफ करावी
सावंतवाडी प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्यात रविवारी मध्यरात्री मुसळधार पाऊस पडला या सततधार पडलेल्या पाऊसामुळे सावंतवाडी तालुक्यातील ग्रामीण भागातील नदीनाले याना पूर आल्याने वाहतूक ठप्प झाली. सावंतवाडी तळवडे वेंगुर्ला मार्गावरील नदीला पाणी भरपूर आल्याने होडावडे पुलावर पाणी आल्याने सोमवारी पहाटे पासुन ५ तास वाहतूक ठप्प होती . वाहनचालक व प्रवाशी याचे मोठे हाल झाले .
तळवडे बाजारपेठ मध्येपणं मुसळधार पडलेल्या पाऊसाचे पाणी शिरले. तळवडे बाजारपेठ मध्ये गटार व्यवस्था नसल्याने पाणी शिरत आहे. वाढती दुकानाची संख्या यामुळे पाण्याचा निचरा होण्याचे प्रमाण घटल्याने अनेक दुकानांमध्ये पाणी शिरणार आहे . यामुळे अनेक दुकानदार याच्या सामानाची नासधूस होउ शकते तसेच तळवडे बाजारपेठ मध्ये गटार बांधकाम याचे नियोजन नसल्याने पाणी दुकानात शिरते जी गटारे आहेत त्याची संबंधित सार्वजानिक बांधकाम विभाग कडून साफसफाई पण झाली नाही . त्यामुळे पाणी दुकानात जाणार आहे.सतत धार पाऊसपडला तर तळवडे नेमळे , तळवडे मातोंड वाहतूक बंद होतें. पुलाची उंची कमी असल्याने पुलावर सतत पाणी येते. सावंतवाडी तळवडे वेंगुर्ला मार्गावरील होंडावडे तळवडे पुलावर पाणी आल्याने वाहतूक लगेच ठप्प होते त्यामुळे यापूलाची उंची वाढवावी अशी मागणी वाहनचालक व प्रवाशी वर्ग यांच्याकडून होत आहे . तरी पणं यांची दखल घेतली जात नाही.







