भोसले नॉलेज सिटी सावंतवाडी येते आयोजित चाय पे चर्चा कार्यक्रमात व्यक्त केले मत
आताच्या युवा पिढीकडे “टॅलेंट”भरपूर
सावंतवाडी
आत्ताच्या युवा पिढीकडे “टॅलेंट” खूप आहे. त्यामुळे देशाला
आत्मनिर्भर करण्यासाठी युवा पिढीचे हात बळकट करण्याची गरज आहे,असे मत भोसले नॉलेज सिटी सावंतवाडी येथे आयोजित कार्यक्रमात देशाचे थोर शास्त्रज्ञ डॉ.
रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केले.

अशक्य आहे ते शक्य करण्याचा निश्चय मनाशी बाळगून काम केल्यास कोणतेही काम कठीण होत नाही. मात्र त्यासाठी अतूट इच्छाशक्ती गरजेची असते.कोकणात निसर्ग आणि बौध्दीक क्षमता आहे. त्यामुळे आपल्याला सिध्द करण्यासाठी दिल्ली, बेंगलोर मध्ये जाण्याची गरज नाही, असे त्यांनी आवाहन केले. भोसले नॉलेज सिटीच्या माध्यमातून कार्याध्यक्ष अच्यूत भोसले यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या चाय पे चर्चा या कार्यक्रमात उपस्थितांशी श्री. माशेलकर यांनी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.यावेळी जयू भाटकर व सागर देशपांडे यांच्यासह विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी सुहास सातोसकर, प्रविण परब, दिलीप म्हापसेकर, डॉ. राजेश नवांगुळ,विद्याधर तायशेटे, विशाल जोशी, नकुल पार्सेकर, प्रविणकुमार ठाकरे, डॉ. दिपक तुपकर, पाडुरंग काकतकर, अनंत उचगावकर,श्रीधर ओगले, जितेंद्र पंडीत आदी उपस्थित होते.







