वेंगुर्ला/प्रतिनिधी:
होडावडा येथील श्री देव क्षेत्रपालेश्वर सातेरी मंदिर येथे मंगळवार, दिनांक ३१ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता भव्य दशावतार नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री सावरेश्वर दशावतार नाट्यमंडळ, आवेरा (ता. वेंगुर्ला) यांच्या वतीने ‘श्री क्षेत्र गाणगापूर’ हे नवीन नाटक सादर केले जाणार आहे.
हे नाटक दत्त भक्तीवर आधारित असून, दत्त नामस्मरणाचे महत्त्व सांगणारा हा प्रयोग विनोदी, भक्तीमय आणि हृदयस्पर्शी असणार आहे. या नाटकाची कथा संकल्पना श्री. अजित गाडगीळ (गुरुजी) यांची आहे.
दिग्गज कलाकारांचा सहभाग
या प्रयोगामध्ये दशावतारातील नामांकित कलाकार आपली कला सादर करणार आहेत.
यामध्ये प्रामुख्याने काका आकेरकर, सुशील रेडकर, साईल तळकटकर, राहुल धुरी, श्रीपाद आरोलकर, अमेय साटम, गुरु वराडकर, राजन नाईक, अक्षय नाईक आणि चंदू मिशाळे यांचा समावेश आहे.
नाटकाला हार्मोनियमवर अमोल आकेरकर, पखवाजवर राजू शिरोडकर आणि झांज वादनासाठी प्रमोद आकेरकर हे साथसंगत करणार आहेत.
समस्त मानकरी, देवसेवक आणि ग्रामस्थ होडावडा यांच्या वतीने या दशावतार नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले असून, सर्व नाट्यप्रेमी आणि भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.







