
अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ शाखा वेंगुर्ला मार्फत गुणवंत शिक्षक,विद्यार्थी, सेवानिवृत्त शिक्षकांचा सन्मान
वेंगुर्ला
वेंगुर्ला शिक्षक संघाने शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवान विद्यार्थी, तसेच सेवानिवृत्त शिक्षक श्रीम. दीप्ती दीपक कोचरेकर , श्री भिवा सावंत यांचा तसेच मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा,परसबाग ,. विविध क्षेत्रात प्राविण्य प्राप्त शिक्षकांचा गुणगौरव कार्यक्रम आयोजित केला होता. सदर कार्यक्रमाला गटविकास अधिकारी श्री. वासुदेव नाईक यांची उपस्थिती लाभली. श्री नाईक साहेब यांनी अखिल संघ ही शैक्षणिक ,सामाजिक ,सांस्कृतिक क्षेत्रात काम करणारी संघटना आहे या शब्दात कौतुक केले.तसेच कृषी अधिकारी श्री चव्हाण साहेब, नवनियुक उपशिक्षणाधिकारी श्री ढाने साहेब, तुळस प्रभाग विस्तार अधिकारी श्री भाऊ कोनकर, उपस्थित होते.त्यांनी विद्यार्थी वर्गासाठी घेतलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले. तालुकाध्यक्ष श्री तेजस बांदिवडेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या भव्य दिव्य अशा कार्यक्रमाला जिल्हा अध्यक्ष श्री लक्ष्मण वळवी, श्री राज्य उपाध्यक्ष श्री म. ल.देसाई, राजा कविटकर,श्री सुभाष सावंत यांनी आपले संघटनात्मक विचार मांडले. संपूर्ण कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जिल्हा उपाध्यक्ष श्री दीपक दत्ताराम वेंगुर्लेकर यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्रसाद गावडे आणि दिपेशn परब यांनी तर आभार श्री संजय परब यांनी मांडले








