ठळक घडामोडी

सावंतवाडीत पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपची काढण्यात भव्य प्रचार रॅली!

सावंतवाडीत पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपची भव्य प्रचार रॅली!

सावंतवाडी:

आगामी सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने आज शहरात जोरदार शक्तिप्रदर्शन केले. पालकमंत्री नितेशजी राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत सावंतवाडी शहरात एक भव्य प्रचार रॅली काढण्यात आली, ज्याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

पाटेकर देवस्थानचा आशीर्वाद घेऊन रॅलीचा आरंभ

राजवाडा येथील पाटेकर देवस्थानचा आशीर्वाद घेऊन रॅलीची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर ही प्रचार रॅली संपूर्ण शहरातून फिरली, ज्यामुळे सावंतवाडी शहराचे वातावरण पूर्णपणे भाजपमय झाले होते.

राणे यांनी साधला व्यापारी, नागरिकांशी संवाद

या प्रचार रॅलीदरम्यान पालकमंत्री नितेशजी राणे यांनी सावंतवाडी बाजारपेठेतील व्यापारी तसेच ज्येष्ठ नागरिकांशी थेट संवाद साधला. त्यांनी नागरिकांना भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. श्रद्धाराजे भोसले यांच्यासह सर्व नगरसेवक उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार: सौ. श्रद्धाराजे भोसले तसेच
सर्व भाजप उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन करण्यात आले
या रॅलीला सावंतवाडी बाजारपेठेतील व्यापारी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त व सकारात्मक प्रतिसाद दिला आणि उमेदवारांना शुभेच्छा दिल्या. यामुळे भाजपच्या प्रचार अभियानाला मोठा उत्साह मिळाला आहे. हा भव्य मेळावा आणि रॅली सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीच्या दृष्टीने भाजपसाठी एक मोठी जमेची बाजू ठरली आहे.
यावेळी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. श्रद्धाराजे भोसले, भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष लखमराजे भोसले , माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर ,भाजप युवा नेते विशाल परब,यांच्यासह नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार, भाजपचे असंख्य कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.