ठळक घडामोडी

शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

माझ्मा मतदारसंघातील जनता मला विजयी करतील याचा मला विश्वास

सावंतवाडी

राज्याचे शालेय शिक्षण मंत्री, महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार दीपक केसरकर यांनी आज आपल्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला. विशेष म्हणजे मतदान झाल्यानंतर त्यांनी सेल्फी काढून मतदारांना मतदान करा असे आवाहन केले. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील जनता माझ्यावर प्रेम करते, त्यामुळे चौथ्यांदा ती मला निश्चितच संधी देतील असा विश्वास व्यक्त केला,तर सौ पल्लवी केसरकर व मुलगी सोनाली यांनीही दिपक भाईं विजयाचा चौकार मारतील असा विश्वास व्यक्त केला. आज सकाळी सहपरिवार त्यांनी मतदान करून हकक बजावला