ठळक घडामोडी

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानला मदतीचा हात प्रा.सुभाष गोवेकर 25 हजार तर मुर्गेशन गौंडर यांच्या कडून 25 हजार.

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानला मदतीचा हात प्रा.सुभाष गोवेकर 25 हजार तर मुर्गेशन गौंडर यांच्या कडून 25 हजार.

पटेल परिवाराकडून 11 हजार रुपयाची मदत.

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सेवाभावी कार्याला सर्व स्तराकडून मिळत आहे मदतीचा हात


सावंतवाडी

श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक सुभाष गोवेकर यांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सेवाभावी कार्याची दखल घेऊन संस्थेला 25 हजार रुपयाचा धनादेश दिला तर संस्थेच्या सदस्या रूपा गौंडर (मुद्राळे) यांचे पती तसेच सावंतवाडी शहरातील व्यापारी फास्टर मुर्गेशन गौंडर यांनी 25 हजार रु संस्थेला दिले.
आज काल प्रा. सुभाष गोवेकर यांच्या सामाजिक कार्याला अनेक पुरस्कार मिळत आहेत त्या बाबत संस्थेचे अध्यक्ष प्रा.सतीश बागवे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
तसेच पटेल परिवाराने सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सेवाभावी कार्याचा प्रत्यक्षात अनुभव घेतला आहे असे सांगून त्यांनी हि पटेल परिवारा कडून संस्थेला 11 हजार रुपयाची देणगी देण्यात आली.
या सर्व दात्यांना संस्थेकडून रितसर देणगी पावती देऊन त्यांचे संस्थेचे अध्यक्ष प्रा.सतीश बागवे व उपाध्यक्ष प्रा.शैलेश नाईक यांनी आभार मानले आहेत.
या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष प्रा.सतीश बागवे, प्रा.सुभाष गोवेकर, सदस्या शरदिनी बागवे, रूपाली गौंडर( मुद्राळे) लक्ष्मण कदम व रवी जाधव उपस्थित होते.