ठळक घडामोडी

दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची मंत्री नितेश राणे यांनी घेतली सदिच्छा भेट

दिल्ली | प्रतिनिधी :
महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी नवी दिल्ली येथे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची सदिच्छा भेट घेतली.

या भेटीदरम्यान पक्ष संघटना अधिक बळकट करणे, जनसेवेच्या कार्याला अधिक गती देणे तसेच आगामी काळातील संघटनात्मक कामकाजाबाबत सकारात्मक आणि सविस्तर चर्चा झाली. पक्षाची विचारधारा अधिक प्रभावीपणे तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच संघटनात्मक बळकटीसाठी विविध विषयांवरही संवाद झाला.

यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या मार्गदर्शनातून पक्ष संघटना अधिक सक्षम करण्यासाठी आणि जनतेच्या सेवेसाठी नव्या उत्साहाने कार्य करण्याची प्रेरणा मिळाल्याची भावना मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केली. आगामी काळात पक्षाच्या माध्यमातून जनहिताच्या विविध उपक्रमांना अधिक गती देण्याचा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला.