सावंतवाडी :
प्रसिद्ध मूर्तीकार विलास मांजरेकर यांना प्रतिष्ठेचा ‘कोकण कलारत्न पुरस्कार’ प्राप्त झाल्याबद्दल शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी त्यांची सदिच्छा भेट घेऊन मनःपूर्वक अभिनंदन केले.
मूर्तीकला क्षेत्रात विलास मांजरेकर यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून केलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल यावेळी संजू परब यांनी त्यांचे विशेष कौतुक केले. त्यांच्या कलाकृतींमधून कोकणच्या कला-संस्कृतीला मिळालेली ओळख निश्चितच अभिमानास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
‘कोकण कलारत्न’ पुरस्कार हा मांजरेकर यांच्या प्रदीर्घ कलाप्रवासाचा गौरव असून, भविष्यातही त्यांच्या हातून अशाच उत्कृष्ट कलाकृती साकाराव्यात, यासाठी संजू परब यांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी नगरसेवक गुरुदास मटकर उपस्थित होते.







