ठळक घडामोडी

तळवडे येथे स्वर्गीय प्रकाश परब यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद!

तळवडे येथे स्वर्गीय प्रकाश परब यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; सुकन्या कु. स्वाती परब यांचे पहिलेच रक्तदान!


तळवडे: प्रतिनिधि

स्वर्गीय प्रकाश परब यांच्या सातव्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून प्रकाश परब संपर्क कार्यालय, तळवडे गेट येथे नुकतेच एका भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला परिसरातील रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
हे रक्तदान शिबीर प्रकाश परब मित्रमंडळ, श्रीसिद्धेश्वर ग्रामोत्कर्ष मंडळ तळवडे, तळवडे अर्बन बॅंक, शिवरामभाऊ जाधव सेवाश्रम, तळवडे विकास सोसायटी, रोटरी क्लब तळवडे आणि ऑन कॉल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते.
यावेळी प्रकाश परब मित्रमंडळाचे सुरज परब, रवींद्र सावंत, विलास नाईक, नारायण परब, श्री मालवणकर सर, आपा परब, बाळू मालवणकर, महेश परब, शरद परब, अनिल जाधव, योगेश सावंत, काशीराम कुंभार, राजन जाधव, आबा रेडकर, तात्या परब, विनोद वराडकर, प्रशांत परब, संतोष राऊळ, संजय परब, रोहित परब, चंदू परब, दिनेश परब, मनोज मुळीक, श्रीराम आगरवाडेकर, सुनील परब, शामसुंदर कुंभार, शामसुंदर रेडकर, भीमसेन नाईक, राजन कोरगावकर, रोहन परब, राजन काष्टे, रघुनाथ गावडे, डॉ गावडे, पंढरीनाथ मांजरेकर, दिलीप गावडे, राकेश हरमलकर, कु. स्वाती प्रकाश परब, सौ शामल रेडकर, सौ नमिता परब, कु. किरण परब, गौरवी तळवडेकर, गौरी वैद्य, करुणा कुंभार, दिपाली पेडणेकर आदि मान्यवर उपस्थित होते.


या रक्तदान शिबिरामध्ये रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. निलेश आटक, रक्तपेढी तंत्रज्ञ प्राजक्ता रेडकर, मानसी बागेवाडी आणि रक्तपेढी सहाय्यक अनिल खाडे यांनी यशस्वीरित्या रक्तसंकलन केले. शिबिरात ऑन कॉल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्गचे सचिव बाबली गवंडे, खजिनदार सिद्धार्थ पराडकर, कार्यकारिणी सदस्य सचिन कोंड्ये, संस्थेचे सदस्य मंगेश माणगावकर तसेच सौ. श्रीया माणगावकर यांची देखील विशेष उपस्थिती होती.
अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या शिबिरात तब्बल तीस रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
वडिलांना आगळीवेगळी आदरांजली:
या शिबिरातील सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे स्वर्गीय प्रकाश परब यांची सुकन्या कु. स्वाती प्रकाश परब यांनी आपल्या परमपित्याच्या स्मृतिदिनानिमित्त आपल्या आयुष्यातील पहिलेच रक्तदान करून आपल्या पिताश्रींना एक आगळीवेगळी आदरांजली वाहिली.
याशिवाय काशीराम कुंभार, संजय परब, सुजय परब, प्रताप परब, विलास कोंड्ये, गणेश बुगडे, प्रशांत परब, रोहन परब, ओंकार नाईक, साहिल परब, श्रीराम आगरवाडेकर, शुभम परब, रुपेश भैरे, हेमंत गोडकर, पुरुषोत्तम सावंत, अजित जाधव, शुभम मालवणकर, देवेश डिचोलकर, आनंद परब, संदेश रेडकर, अजय हरमलकर, मनोज मुळीक, प्रकाश कांडरकर, शुभम नाईक, स्वप्नील परब, अनिल जाधव, वासुदेव परब, राकेश हरमलकर, विकी जाधव यांसह अनेक तरुणांनी रक्तदान करून एक आदर्श घालून दिला.रक्तदान शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व सहभागी संस्था आणि रक्तदात्यांचे परिसरातून कौतुक होत आहे.