
सावंतवाडी प्रतिनिधि
दक्षिण कोकणचे पंढरपूर सोनुर्ली येतील श्री देवी माऊलीचां वार्षिक जत्रोत्सव मंगळवारी थाटात साजरा करण्यात आला. सकाळीं धार्मिक कार्यक्रम पार पडल्या नंतर देवीच्या दर्शनाला सुरुवात करण्यात आली.
दक्षिण कोकणचं पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तसेच नवसाला पावणाऱ्या सोनुर्ली येथील श्री देवी माऊलीच्या
वार्षिक जत्रोत्सवास मंगळवारी प्रारंभ झाला आहे. सकाळी धार्मिक कार्यक्रम पार पडल्यानंतर दर्शनाला सुरुवात करण्यात आली.जत्रोत्सवानिमित्त देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्र राज्यसह गोवा, कर्नाटक राज्यातील भाविक सोनुर्लीत हजेरी लावत आहेत. गाभाऱ्यात फळा, फुलांचीआरास करण्यात आली असून भरजरी साडी, दागिन्यांनी सजविलेल्या देवीच्या मूर्तीस आज वेगळच तेज दिसून येत आहे.सकाळपासून मुखदर्शन, ओट्या भरण्यांचा कार्यक्रम सुरु झाला असून रात्री लोटांगण घालून नवस फेडले जाणार आहेत. मंगळवारी पहाटेपासून भाविकांच्या गर्दीत कोकणची पंढरी दुमदुमून गेली आहे.
श्री देवी माऊलीची मूर्ती सुबक व आकर्षक सजविण्यात आली होती. जत्रोत्सवानिमित्त सोन्याचांदीच्या दागिन्यांनी तिला सजविण्यात आले होते . श्री देवी माऊलीची मुर्ती सुबक सजविण्यात आली होती. वस्त्रलंकारा घालून मुर्ती सजविण्यात आली होती.हे सुवर्णालंकारांनी नटलेले मनोहारी रूप पाहण्यासाठी लाखो भाविक यांनी गर्दी केली होती.
जत्रोत्सवाला लाखो भाविकांची गर्दी असली तरी अतिशय शांततामय वातावरणात हा सोहळा पार पडला. अगाध महिमा असलेल्या माऊली देवीचे मंदिर नव्याने भवदिव्य उभारण्यात आले आहे. . सोनुर्ली जत्रोत्सवाला लाखो भाविकांचा जनसागर लोटला आहे. मोठ्या स्वरूपात खरेदी-विक्री झाली. एसटी महामंडळाच्या बसेस आणि खासगी वाहनांतून लाखो भाविक गर्दी केली होती. जत्रोत्सवाचे विलक्षण दृष्य पाहण्यासाठी भक्तांनी गर्दी केली होती. देवीच्या मंदिराचा झगमगाट, देवीचे सुखमय दर्शन डोळ्यात साठवून भाविक भारावून गेले. यावर्षी या जत्रोत्सवाला मोठ्या प्रमाणात भक्तगणांची गर्दी केली होती.







