तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 63 श्री देव क्षेत्रपालेश्वर विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीला सलग सातव्या वर्षी ‘अ’ वर्ग केला प्राप्त /सभासदांना ९% लाभांश j वेंगुर्ला होडावडे येथील श्री…
Views: 49 वेंगुर्ला पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसा निमित सेवा पंधरवडा साजरा करत असताना डॉ. सौ. वसुधाज योगा ॲन्ड फिटनेस ॲकडमी वेंगुर्ला आणि…
Views: 47 सिंधुदुर्गनगरी : लोकशाहीचा चौथा स्तंभ बळकट होण्याऐवजी काही समाजकंटकांकडून त्या स्तंभाची बदनामी आणि त्या स्तंभाचे पाईक असणाऱ्या पत्रकारांवर हल्ले होत आहेत या पार्श्वभूमीवर…
Views: 199 (निरवडे प्रतिनिधी): संस्कार नॅशनल स्कूल, निरवडे येथे नुकताच नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने शाळेत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात…
Views: 249 राजे प्रतिष्ठान कामगार सेना, सिंधुदुर्गकडून शिक्षक, विद्यार्थी आणि शिष्यवृत्तीधारकांचा करण्यात येणार सत्कार सिंधुदुर्ग प्रतिनिधी):राजे प्रतिष्ठान कामगार सेना, सिंधुदुर्ग महाराष्ट्र यांच्या वतीन दरवर्षीप्रमाणे यावर्षीही…














