तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 44 राष्ट्रीय ऐक्याचे महामेरू, स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान व गृहमंत्री, ‘लोहपुरुष’ सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 वी जयंती निमित्त भाजपा वेंगुर्ले च्या वतीने अभिवादन.…
Views: 45 शिरोडा – वेळागर वाडीतील शूर नागरिकांचा भाजपा वतीने त्यांच्या घरी जाऊन “वीरता सन्मानपत्र” देऊन गौरव – भाजपा च्या वतीने समीर भगत , आजु…
Views: 50 सोनुर्ली जत्रोत्सवाची युद्ध पातळीवर तयारी सुरू! ६ नोव्हेंबरला भव्य सोहळा!भव्य परंपरा आणि भक्तीचा संगम! दक्षिण कोकणचे प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या सोनुर्ली येथील श्री…
Views: 43 देशातील पहिला AI प्रणाली राबविणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात नीती आयोगाचा दौरा सुरू*पालकमंत्री नितेश राणे यांनी नीती आयोगाच्या सदस्यांचे केले स्वागत सिंधुदुर्ग : देशात आणि…
Views: 35 सावंतवाडी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय ओरोस यांच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय १५००…
Views: 35 अबू धाबी पोर्ट्ससोबत ऐतिहासिक करार; समुद्री विकासासाठी तब्बल ₹16,500 कोटींची गुंतवणूक*मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र सागरी विकासाला मोठी…














