तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 14 वेंगुर्ला आडेली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बाबासाहेबांच्या प्रतिमेच पूजन करून साजरी करण्यात आली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब…
Views: 12 सिंधुर्दुर्गनगरी वेंगुर्ला शहरात विकसित होणाऱ्या ‘नमो उद्याना’मुळे केवळ शहराचाच नाही तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा नावलौकीक होणार आहे. शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या या प्रकल्पामुळे…
Views: 35 कणकवल राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे बुधवार 15 एप्रिल रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत…
Views: 23 सावंतवाडी राजा शिवाजी चौक मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बाबासाहेबांच्या प्रतिमेच पूजन करून मानवंदना दिली जाते याही वर्षीडॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या…
Views: 22 वेंगुर्लेत भाजपा च्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उस्तव उस्ताहात साजरा . आज दिनांक 14 एप्रिल 2026 सकाळी 10.00 वाजता वेंगुर्ला भाजप मार्फत…
Views: 20 सावंतवाडी : तालुक्यातील सातार्डा-तरचावाडा येथील रहिवासी व माजी सैनिक चंद्रकांत पवार यांच्या पत्नी, तसेच ज्येष्ठ पत्रकार हरिश्चंद्र पवार यांच्या मातोश्री सौ. चंद्रावती चंद्रकांत…














