मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचा मार्ग मोकळा; सावंतवाडी संस्थानकडून ७० गुंठे जागा विनामोबदला सुपूर्द! सावंतवाडीकरांचे बहुप्रतिक्षित स्वप्न अखेर पूर्णत्वास; युवराज लखमराजे भोंसले यांची माहिती

सावंतवाडी, ता. २० : गेल्या अनेक वर्षांपासून सावंतवाडीकरांचे स्वप्न असलेले प्रस्तावित मल्टीस्पेशालिटी रुग्णालय आता प्रत्यक्षात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. रुग्णालयासाठी आवश्यक जागेचा प्रदीर्घ काळ प्रलंबित असलेला प्रश्न अखेर न्यायालयीन प्रक्रियेतून यशस्वीरीत्या मार्गी लागला आहे. जनहिताचा व्यापक दृष्टिकोन डोळ्यांसमोर ठेवून…








