Category महाराष्ट्र

मुंबई-गोवा महामार्गावर गोमांस वाहतूक करणारी कार उलटली; ४०० ते ५०० किलो मांस जप्त, चालक ताब्यात

सावंतवाडी, ता. १० (प्रतिनिधी): मुंबई-गोवा महामार्गावरील झाराप ते पत्रादेवी बायपासवरील फोंडाघाटवाडी येथे आज सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास गोमांसाची वाहतूक करणारी एक आर्टिगा कार भीषण अपघातग्रस्त झाली. भरधाव वेगातील कारवरील नियंत्रण सुटल्याने ती दुभाजकावर धडकून रस्त्याच्या पलीकडे उलटली. या अपघातात कारमधील…

सावंतवाडी रोड स्थानकावर ‘राजधानी’, ‘गरीब रथ’सह तीन महत्त्वाच्या एक्स्प्रेसना थांबा; कोकण रेल्वे प्रवाशांसाठी मोठा दिलासा!

सावंतवाडी | प्रतिनिधी कोकणातील रेल्वे प्रवाशांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर तीन महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्यांना व्यावसायिक थांबा मंजूर केला आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यासह संपूर्ण दक्षिण कोकणातील प्रवाशांची दीर्घकाळची मागणी अखेर पूर्ण झाली…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज संकटावर सरकार ॲक्शन मोडवर; सिंधुदुर्गासाठी विशेष मनुष्यबळ व साहित्य रवाना! मुख्यमंत्री कार्यालयाने पालकमंत्री नितेश राणे यांच्या मागणीनुसार घेतली तातडीने बैठक

सांगली, सातारा, बारामती या ठिकाणाहून कामगारांची विशेष पथके सिंधुदुर्गात रवाना मोडलेले पोल तातडीने उभे करून वीज पुरवठा केला जाणार सुरळीत पालकमंत्री नितेश राणे आणि मुख्यमंत्री कार्यालयाचे अप्पर मुख्य सचिव लोकेश चंद्रा यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स घेत दिल्या सूचना राज्याच्या मेजर स्टोअर…

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सोडविण्यासाठी सर्वतोपरी लढा सुरूच राहणार!मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीची बैठक! शरद पवार आणि नारायण राणे या माजी मुख्यमंत्र्यांची विशेष उपस्थिती

शरद पवार आणि नारायण राणे या माजी मुख्यमंत्र्यांची विशेष उपस्थिती मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी महाराष्ट्र शासन सीमाभागातील मराठी बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभे असून, त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरूच राहतील. सीमाभागातील मराठी बांधवांच्या न्याय्य हक्कांचे संरक्षण करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न…

तळवडे गावात वीज ग्राहकांची गैरसोय; महिला वायरमनऐवजी पुरुष वायरमन देण्याची ग्रामस्थांची कुडाळ महावितरणकडे मागणी

सावंतवाडी (प्रतिनिधी)सावंतवाडी तालुक्यातील तळवडे गावात मोठ्या प्रमाणात वीज ग्राहक असून, सद्यस्थितीत निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणींमुळे ग्रामस्थांना तीव्र वीज समस्येचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर, तळवडे येथील ग्रामस्थांनी कुडाळ येथील महावितरण कार्यालयाच्या कार्यकारी अभियंत्यांना लेखी निवेदन सादर करून तात्काळ पर्यायी…

सावंतवाडीतील वीजपुरवठा लवकरात लवकर सुरळीत करणार: महावितरण अधीक्षक अभियंत्यांचे आश्वासन! जिल्हा परिषद सदस्य संदीप गावडे आणि सावंतवाडी पंचायत समिती उपसभापती गौरव मुळीक यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली बैठक

कुडाळ, ता. ७: सावंतवाडी तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या सुरू असलेल्या विजेच्या गंभीर समस्येबाबत भारतीय जनता पार्टीच्या एका शिष्टमंडळाने कुडाळ येथे महावितरणचे अधीक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंता यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात…

तळवडे येथे भटक्या कुत्र्यांचा हैदोस; शेतकऱ्याच्या वासराला केले गंभीर जखमी!परिसरात भीतीचे वातावरण; भटक्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी

तळवडे: येथील शेतकरी प्रभाकर कांडरकर यांच्या सहा महिन्यांच्या म्हशीच्या वासरावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना नुकतीच घडली आहे. या घटनेमुळे तळवडे परिसरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे.मिळालेल्या माहितीनुसार,…

माणगाव येथे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशनतर्फे गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप! पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

माणगाव (प्रतिनिधी):“मुले ही केवळ एखाद्या कुटुंबाची नव्हे, तर संपूर्ण गावाची संपत्ती आहेत. ग्रामीण भागातील या मुलांनी भविष्यात शिक्षणाच्या जोरावर गावाबरोबरच शहर आणि देशपातळीवर आपल्या कर्तृत्वाचा डंका वाजवला पाहिजे,” असे प्रतिपादन माणगावच्या सरपंच सौ. मनीषा भोसले यांनी केले.आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशनच्या…

माजगाव शेतकरी नकाशा प्रश्न अखेर मिटणार: जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत यांच्या यशस्वी पुढाकारानंतर पालकमंत्री नितेश राणे यांचे प्रशासनाला कडक आदेश

सावंतवाडी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील माजगाव येथील शेतकऱ्यांच्या जमिनींचे नकाशे जीर्ण झाल्याच्या कारणावरून ते उपलब्ध करून देण्यास टाळाटाळ करणाऱ्या भूमी अभिलेख प्रशासनाच्या विरोधात माजगाव ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन छेडले होते. या आंदोलनानंतर प्रशासनाने दोन महिन्यांत नकाशे देण्याचे आश्वासन दिले असले, तरी…

दक्षिण कोकणचा ‘स्वर्ग’ अवतरला! मुसळधार पावसाने आंबोली घाट नटला; पहिल्याच रविवारी पर्यटकांचा महापूर! गोवा, कर्नाटकसह सिंधुदुर्गातील पर्यटकांची आंबोलीtत तुडुंब गर्दी,

आंबोली: मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे दक्षिण कोकणचे स्वर्ग मानल्या जाणाऱ्या जगप्रसिद्ध सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली घाटाला अखेर निसर्गाचे हिरवेगार रूप बहाल झाले आहे. येथील विहंगम आणि अथांग धबधबे आता पूर्ण ताकदीने ओसंडून वाहू लागले आहेत. पावसाळ्यातील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या या पर्वतरांगांमधील जलप्रपात सुरू…